कुत्रे भूँकणारे
कुत्रे चावणारे
कुत्रे रक्षणारे
कुत्रे शिकारी
कुत्रे भिकारी
कुत्रे मिंधे
लाचारी धन्दे
लाड घोटे
बूट चाटे !
बहु ढंगी
बहु रंगी
मोठे छोटे
देशी विदेशी
बुल डॉग
हिज मास्टर्स
वफादार व्हाईस
कुठे मोती
कुठे वाघ्या
कुठं सोन्या
कुठं मोन्या !
कधी हत्ती पाठी
कधी गधा लाथी
कधी ऊकिरडा घर
अन्ना साठी
वणवण फिर
कधी दगड धोंडे
कधी काठी मार
हाकलतात फार !
कुत्र शिवे
तुपची वाटी
एकनाथ धावे
त्याचे पाठी
पांडव हिमालया
धर्मराज कुत्रा
पाठलाग कराया
कुत्रा एक नशिबवान
रायगडी समाधी
सरकार राखनदार !
कुत्रा नसे वाघ्या
वाघमारे महार
शिवबाचा शुरविर
अंगरक्षक पाठीराखा
जसा गोविन्द महार
छावा चा ईमानदार !
ध चा मा हे करी
वाघमारे महार परि
कुत्रा वाघ्या बरी
नको महार मोठेपण
कुत्रा त्या हुन
मोठे जान म्हणे ब्राह्मण !
No comments:
Post a Comment