डॉ कविता वरे (भालके), सरपंच, किसळ ग्राम, पंचायत, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र यांना अखिल भारतीय स्वरूपाचा नेटिव रुल मुव्हमेंट आणि मूलभारतीय विचार मंच संयुक्त स्थापित पहिला मानाचा *मूलभारतीय समाजरत्न पुरस्कार २०२४* ९ ऑगस्ट २०२४ जागतिक आदिवासी दिनानिमित्त पुष्पगुच्छ, मानपत्र, मानाचा सपेद कबीर शेला, मानाची सफेद कबीर टोपी व पुरस्कार पाकीट देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉक्टर कविता वरे या आदिवासी समाजाच्या कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्या असुन उच्च शिक्षित आहेत, त्यांनी राज्यशास्त्र विषयात मुंबई विद्यापीठातून पीएचडी केली आहे.
त्यांचा कार्य आवका व्यापक असुन भारतीय समाजाचा सर्वांगीण विकास हा त्यांचा ध्यास आहे.
#नेटिव रुल मुव्हमेंट आणि #मूलभारतीय विचार मंच यांचे मनपूर्वक आभार.....
हा पुरस्कार पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी आहे...
No comments:
Post a Comment